Thursday, 29 October 2015

अलंकाराचे अनमोल लेणे :दागिने घालताना प्रत्येकाचं महत्व :सौ. विद्या फडके


मला भावलेलं सौ. विद्या फडके यांनी लिहिलेल  अलंकाराचे अनमोल लेणे नक्की आवडेल सगळ्यांना 


*       सौभाग्यलक्ष्मीचा पहिला दागिना म्हणजे कपाळीचा कुंकुम तिलक  सूर्याच्या प्रभेप्रमाणे तो सतत तेजोमय ठेवण्यासाठी मानसिक बळ ठेव व प्रयत्नशील रहा.
*      मंगळसूत्राचा पवित्र दागिना गळ्यात धारण करताना सासरमाहेरच्या वाट्यात धार्मिकता व पावित्र्य यांची जपणूक कर. हातातील हिरवा चुडा घालताना चुड्याप्रमाणे मन सदा प्रसन्न व बहरत ठेव.
*      नाकात नथ घालताना चेहऱ्यावरील आत्मविश्वास टपोऱ्या मोत्याप्रमाणे तळपत ठेव. नथीप्रमाणे विनम्रता राख. > कानातील कर्णभूषणे तुला बजावत आहेत, हलक्या कानाची होऊ नकोस.
*      बाजुबंद घालताना अभिमानाला बंद घाल.
*      हातातल्या गोठपाटल्या सांगताहेत, मनगट आमच्यासारखे बळकट कर.
*      तोड्याची खीळ लावताना रागाला खीळ घाल.
*      गळ्यातील चपलाहार सांगतोय, आळशी बनू नकोस. माझ्यासारखी चपल हो.
*      मोहनमाळ खुणावतेय, माझ्यासारखी सर्वांना आपल्या वागण्याने मोहिनी घाल.
*      चिंचपेटी बजावते, मला जपतेस तशी स्वरपेटीला जप. तिला तारसप्तक आवाज आवडत नाही.
*      अनामिकेतील अंगठी प्रथमपासून हुरहूर लावते व खड्याचे तेज समोरील भाग्य चमकवून टाकते. अंगठीप्रमाणे बोटात कला खेळव व सर्वांना प्रिय हो.
*      कमरपट्टा बजावतो आहे, अवखळ मनाला बांध घाल. कमर कसून सर्वांना कामाने सामवून घे.
*      मेखलेतील - छल्ल्यातील चावी आवाज करून सांगतेय जबाबदारी नीट संभाळ,पेल.
*      पायातील साखळ्या निनादत आहेत, तुझ्या वागणुकीने या निनादाप्रमाणे सर्वांच्या मनात निनादत रहा.
*      जोडवी - सर्व देहाचा उंबरठा ! जोडव्याचा आवाज सांगत आहे, आपला पाय कधीही वाकडा पडू देऊ नको.
*      डोईवरच्या पदराचा शेव, शेला सांगत आहे, माझे स्थान अढळ आहे. तुझे पातिव्रत्य, धार्मिकता ही पैठणीसारखी सळसळत ठेव व पदराचे पावित्र्य राख.

*      केसातील गजरा कानाशी गुंजारव करत सांगत आहे. माझ्या सुगंधासारख्या तुझ्या गुणांचा परिमल सर्वत्र दरवळत ठेव. ओठावर सतत सायली पुष्पांचं हसू ठेव. हे दागिने घालताना प्रत्येकाचं महत्व समजावून घे व भावी आयुष्यात 'प्रियदर्शिनी ' हो.  : 

Tuesday, 27 October 2015

की घेतले व्रत न हे आम्ही अंधंतेने -Marathalaginsarai Online Matrimonial

"की घेतले व्रत न हे आम्ही अंधंतेने" सावरकरांच्या या स्फूर्तिदायक शब्दांनीच आमच्या मराठा लगीन सराई वधु वर सूचक ऑनलाइन केंद्राची सुरवात केली आहे.

आजकाल सगळ  जग हे इंटरनेट ने जोडला गेल आहे. आपल्या अपत्याना अनेक ठिकाणी , वेगवेगळ्या  क्षेत्रात नोकऱ्या  मिळू  लागल्या आहेत. मुलांच लग्न हे जेवढे आनंददायी असते तेवढेच ते जमवने जिकारीचे झाले  आहे. मुला-मुलींच्या  अपेक्षा , दृष्टिकोण  झपाट्याने बदलत आहेत , त्याची पूर्तता होणे तेवढेच गरजेचे आहे आणि त्यासाठिच हा सगळा अट्टाहास. आमच्या  मराठा लगीन सराई ऑनलाइन matrimonial   झाल्याने ह्या सगळ्या  गोष्ठी एका छताखाली सुसह्य झाल्या आहेत. अनेक मराठा वधुवर तुम्हाला घरबसल्या पहायला मिळतील.

राज्य , प्रदेशातील व जगातील सर्व शिक्षित व उच्च शिक्षित 96 Kuli  मराठा वधूवरांना एकाच वधूवर सूचक केंद्रात जमवून प्रत्येकाला मनासारखा सोबती व मनासारखा सून जावई मिळवून देणे हेच मराठा लगीन सराई चे उद्दिष्ठ.

त्यासाठी आम्ही मुंबई पुणे सातारासांगली सोलापूर कोल्हापूर नगर नाशिक विदर्भ ह्या जिल्ह्यांसाठी  साठी www.marathalaginsarai.com  हि वेबसाईट आहे तर 

कोकण विभागासाठी , रत्नागिरी , सिंधुदुर्ग ,रायगड , ठाणे येथील मराठा वधु वरांसाठी आम्ही
www.marathalaginsaraikokanastha.com हि वेबसाईट  चालू केली आहे


 मराठा वधूवरांना अनुरूप जोडीदार व  पालकांना  मनपसंद सुन जावई मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे 
यासाठी सर्व आधुनिक सेवा सुविधा , मार्गदर्शन पालकांना व  वधूवरांना आपुलकीने व प्रेमाने देणे हीच मराठा लगीन सराई आता व्रत आहे . तुम्हा सगळ्यांचे  आशीर्वाद् हवेत 

३१ डिसेंबर २०१५ पर्यंत जे वधूवर register करतील त्यांना वर्षभर मोफत २२५ contact no  सहित profile बघायला मिळणार आहेत त्वरा करा !!!

लवकरच भेटू नवीन विषया सोबत